Search This Blog
लाडकी बहीण
लाडकी बहीण योजना सुरू करण्याच्या तयारीत महाराष्ट्र सरकार
मध्यप्रदेशातील लाडली बहीण योजना च्या धरतीवर महाराष्ट्र मधील गरीब व आर्थिक बिकट परिस्थितींच्या निम्न मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पैसे जमा करण्याची योजना आखावली जात आहे.
आपल्या महाराष्ट्रामध्ये हे एक आनंदाची बातमी आहे की आपल्या महाराष्ट्रातील महिलांकरिता महाराष्ट्र राज्य सरकार महिलांच्या परिस्थितीत आर्थिक सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारची धडपड चालू आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक महिला ही कोणाची ना कोणाची लाडकी बहीणच आहे.
सगळ्या महिलांकरिता लडकी बहीण योजना चा निर्णय महाराष्ट्र सरकार घेत आहे. ही योजना चांगल्या प्रकारे राबणार आहे महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गरीब कुटुंबातील मध्यमवर्गीय बिकट परिस्थिती हे बऱ्याच महिला या संकटांना सामोरे जात आहेत. तरीही एक खुशखबर आहे. या योजनाद्वारे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना चांगल्या प्रकारे मदत होईल या हेतूने हातभार लावण्याच्या तयारीत महाराष्ट्र सरकार आहे.
महाराष्ट्र राज्याच्या बालकल्याण मंत्री यांच्या कार्यालयाने लाडकी बहीण योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे, असे सांगितले जात आहे . या योजनेचा फायदा आपल्या लाडक्या बहिणींना अतिशय चांगल्या प्रकारे फायदा महाराष्ट्रातील सुमारे दीड कोटी महिलांना होईल अशी अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर योजनेचे सादरीकरण झाले आहे.
त्यांनी या योजनेमध्ये काही बदल सुचवले असून, त्यानुसार योजना सुधारित केली जात आहे. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी महिलांकरिता’ लाडली बहीण योजना आणली आहे. त्या मार्फत महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1,250 रुपये जमा होऊ लागले. मध्यप्रदेशमध्ये प्रत्येक महिन्याला 1,250 रुपये रक्कम दिले जाते परंतु महाराष्ट्र मध्ये पेक्षाही जास्त रक्कम देण्याचा प्रस्ताव चालू आहे. महिला व बालकल्याण विभागाने आधीच लेक लाडकी योजना आणली आहे.
या पद्धतीने असतील अटी आणि पात्रता
पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारक कुटुंबातील महिलांना लाभ दिला जाईल, अशी सूत्रांनी सांगितले.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा असू नये ही अट आहे.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वयाची अट 21 वर्षे ते 60 वर्षे एवढी आहे.
सदरील योजना मध्यप्रदेश सरकारच्या’ लाडली बहन ‘ योजनेच्या आधाऱे महाराष्ट्र मध्ये पण लाडकी बहीण योजना या नावाने राबवली जाणार असून सदरील योजनेचा प्रस्ताव तयार केलेला आहे. लवकरात लवकर ही योजना महाराष्ट्र राज्यात सुरू केली जाणार आहे.
नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीच्या फटक्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यामध्येच आता राज्यातील महिलांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी महायुती सरकारकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्यामधील एक भाग म्हणून मध्यप्रदेशाच्या धरतीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना चालू करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया
ही योजना महाराष्ट्र मध्ये चालू झाल्यास राज्यांमधल्या तिजोरीवर प्रत्येक वर्षाला साधारण 15 ते 20 कोटी रुपयांचा भार पडणार असल्याचे म्हटले जात आहे.
वर्तमानपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, ” राज्यांमधील शिंदे सरकार महिलांकरिता लवकरात लवकर मुख्यमंत्री लाडकी बहीण ‘ योजना सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील तरुण आणि महिला आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय सरकार घेण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. अधिकाऱ्यांचे एक एक पथक मध्य प्रदेशाला पाठवले होते. या पथकाद्वारे मध्यप्रदेशातील मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा अभ्यास करण्यात आला. ही योजना महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष लागू करण्यावर काम केले जात आहे असल्याचे सांगितले आहे. या सूत्रांच्या माहितीनुसार या वेळेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या योजनेची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेचे स्वरूप
या योजनेद्वारे गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दारिद्र रेषेखालील 90ते 95 लाख महिलांना प्रत्येक महिन्याला 1200 ते 1500 रुपये रक्कम दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
योजनेचा उद्देश
महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करून त्यांची चांगल्या प्रकारे मदत करणे या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे, असे सांगण्यामध्ये येत आहे.
या योजनेद्वारे गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दारिद्र रेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना प्रत्येक महिन्याला 1200 ते 1500 रुपये रक्कम दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करून त्यांची चांगल्या प्रकारे मदत करणे या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे, असे सांगण्यामध्ये येत आहे.
21 ते 60 वर्ष वयोगटातील दारिद्र रेषेखालील महिला घटस्फोटीत, परितकत्या, विधवा महिलांना या योजनेचा लाभ मिळणारअसून ही रुपये रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
का आणली जात आहे योजना
लाडली बहणा या माध्यमातून मध्य प्रदेशातील गरीब महिलांकरिता सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते या योजनेमध्ये मध्यप्रदेशमध्ये सरकारला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे म्हणून या योजनेच्या जोरावर शिवराज सिंह मध्य प्रदेशाची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकली आहे. महिला मतदारांनी त्यांना मत भरभरून दिली होती. आता झालेल्या निवडणुकीत भाजपाला 29 पैकी 29 जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे शिवराज सिंह यांचे प्रारूप ही योजना महाराष्ट्रातही राबवल्यास महायुतीला चांगला चांगल्या प्रकारे फायदा होईल अशी आशा माहितीच्या घटक पक्षांना असायला पाहिजे. त्यामुळेच मध्य प्रदेशाच्या धरतीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगल्या प्रकारे राबवण्याची शक्यता आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Ladli Behna Scheme Maharashtra 2024
Ladli Behna Scheme Maharashtra 2024 Apply Online, Eligibility, Benefits, Amount June 30, 2024 by Kapil Singh Nehra Many women in the state o...
-
Contact Lenses - the Latest Trends Nov 2 06:19 2005 Tanya Turner Tanya Turner Share this article on Facebook Share this article on Twitter...
-
Swimming with a yeast infection is generally safe, but precautions should be taken. Yeast infections are not contagious, so there is no ri...
-
Why Was Stevia Banned in Europe? Jun 18 06:27 2024 Jane Scaplen Jane Scaplen Share this article on Facebook Share this article on Twitter ...
No comments:
Post a Comment